नमो शेतकरी सन्मान योजनेचा 6 वा हप्ता मिळणार का? वाचा संपूर्ण माहितीशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता 24 तारखेला वितरित केला जाणार आहे, मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता यावेळी मिळणार नाही असे स्पष्ट झाले आहे.पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार?केंद्र सरकारने डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील पी एम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता 24 तारखेला वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथे या हप्त्याचे वितरण करणार आहेत. तसेच, महाराष्ट्रातील मुख्य कार्यक्रम साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.या हप्त्या अंतर्गत राज्यातील 92.88 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार असून, एकूण 1,967 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.नमो शेतकरी सन्मान योजनेचा 6 वा हप्ता का मिळणार नाही?यापूर्वी 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. त्याचवेळी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेचा 5 वा हप्ता देखील दिला होता.मात्र, यावेळी राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्या च्या वाटपाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या हप्त्या साठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतकऱ्यांनी काय करावे?पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे का, हे pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासा.भविष्यातील शेतकरी योजना व अनुदानाबाबत त्वरित माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन करा.👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हाही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अधिक अपडेट्स साठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा!
