अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटींचा निधी मंजूर – शासन निर्णय जाहीर!
राज्यात २०२४ च्या जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ६ लाख शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी ४५ लाख ८४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, २८ मार्च २०२५ रोजी यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार?
राज्यातील पाच विभागांतील २२ जिल्ह्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
विभागानुसार मंजूर निधी
नाशिक विभाग – ३६३.६६ कोटी
अमरावती विभाग – ३२४.४७ कोटी
पुणे विभाग – १६.०२ कोटी
नागपूर विभाग – २४.१४ कोटी
जिल्हानिहाय मदत
बुलढाणा – ३००.३५ कोटी (सर्वाधिक)
नाशिक – १९३.०७ कोटी
जळगाव – १४४.८९ कोटी
अकोला – २२.७३ कोटी
वर्धा – ११.७६ कोटी
पालघर – ९.६७ कोटी
धुळे – ९.१९ कोटी
नागपूर – १० कोटी
गडचिरोली – २.३९ कोटी
यवतमाळ – ४८ लाख
सांगली – ८.०५ कोटी
पुणे – २.६० कोटी
ठाणे – ३.०२ लाख
रायगड – ३.२५ लाख
रत्नागिरी – १.२१ लाख
सिंधुदुर्ग – ५.०२ लाख
संत्रावर्गीय फळ पिकांसाठी १६५ कोटींची मदत
राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये संत्रावर्गीय फळ पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या नुकसानीसाठी १६५ कोटींच्या विशेष निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मदतीसाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा!
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर महत्वाची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.
🔗 WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
✅ ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळवून द्या!