शेतकरी कर्जमाफी: अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार? ३१ हजार कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा!

शेतकरी कर्जमाफी: अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार? ३१ हजार कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा!

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्षात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकरी १० मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

शेतकऱ्यांवर ३१ हजार कोटींचे कर्ज

राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांवर बँकांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांकडील थकित पीककर्ज सुमारे ३१ हजार कोटींच्या घरात पोहोचले आहे. मागील वर्षी दुष्काळ, अवकाळी पाऊस, कमी उत्पादन आणि बाजारभाव कोसळल्यामुळे अनेक शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत.

महायुती सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ जाहीर करून ३६ हजार कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे शेतकरी असा सवाल करत आहेत की, ३१ हजार कोटींची कर्जमाफी शक्य नाही का?

कर्ज फेडायचं कसं? उत्पादन खर्चही निघत नाही!

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव निचांकी पातळीवर गेले.

तूर आणि हरभऱ्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली, पण त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना झाला नाही.

उत्पादन खर्च वाढला, पण अपेक्षित भाव मिळाले नाहीत.


यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे.

कर्ज थकल्याने शेतकऱ्यांची अडचण

बँकांकडून नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे. हमीभावाने विकलेल्या पिकाचे पैसेही थेट कर्ज खात्यात वळवले जात आहेत. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत.

सरकार आश्वासन पाळेल का?

भाजप आणि महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफीच नव्हे, तर पूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान हे आश्वासन दिले होते. आता अर्थसंकल्पात प्रत्यक्ष किती मोठा निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी WhatsApp ग्रुपला जॉइन करा!

शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी आणि शेतीविषयी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा!
✅ लिंक: WhatsApp ग्रुप जॉइन करा

ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा!

Leave a Comment